Vaccination : लस घेतल्यानंतर कितीवेळ Virus पासून सुरक्षा कवच मिळतं? जाणून घ्या संक्रमण टाळण्याचे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गतवर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाने देशात हाहाकार आहे. तर कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. देशातील अनेक कोट्यावधी नागरिकांना लसीचा डोस देण्यात आला आहे. आणि सध्याही लसीची प्रक्रिया सुरु आहे. तर या लसीचे दुष्परिणामही दिसून येत आहे, तसेच लसीकरण केल्यानंतर लोकांमध्ये विषाणूशी लढण्याची क्षमता वाढते असे एक अभ्यासातून समोर आले आहे.

कोरोना प्रतिबंध ही लस आयुष्यभर कोरोना टाळण्याची हमी देत नाही, मात्र व्यक्ती काही काळ कोरोना संसर्गास लढा देऊ शकते. जर लस दिली तर त्यांच्या शरीरात कितीवेळ कोरोना विषाणू राहतो ? अथवा लसीकरण झालेल्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती किती दिवसात वाढते ? याबाबत जाणून घ्या,

लसीकरण करणे का आवश्यक ?
काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाच्या दाव्यानुसार लस घेणार्‍या लोकांची प्रतिकारशक्ती लक्षणीय वाढते. यंदाच्या कोरोनाच्या लाटेत ही चांगली बातमी आहे. ज्या लोकांना कोरोनाची लागण झालीय आणि तसेच ज्यांनी लसीचा प्रथम डोस घेतला आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाशी लढा देण्याची क्षमता अधिक आहे. त्यानंतर पुन्हा संसर्गाचा धोका कमी होतो. यामुळे, या लसींचे २ डोस शरीरात रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी गरज असल्याचे म्हटले. असे तज्ज्ञाने म्हटले आहे.

अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या माहितीनुसार, की Pfizer-Bioentech आणि मॉडर्ना या लसी ८० टक्क्यांपर्यंत प्रभावी आहेत, दुसर्‍या लसीच्या डोसनंतर त्याचा परिणाम ९० टक्के होता. दुसरीकडे, सीरमनं दिलेल्या माहितीनुसार २ ते ३ महिन्यांत कोविशिल्ड लस दिली गेली तर प्रभाव ९० टक्क्यांपर्यंत राहतो. तसेच, मेरिकेतील मॉडर्ना आणि फायझर यांनी विकसित केलेल्या लसींमध्ये कोरोना संसर्गाची प्रतिकारशक्ती २ ते ३ वर्षांपर्यंत वाढू शकते. असे टेक्सास विद्यापीठातील विद्यापीठातील प्रायोगिक पॅथॉलॉजी ग्रॅज्युएट प्रोग्रामचे संचालक जेरेमी मॅकब्राइड यांनी दावा केला आहे.

किती दिवसांचा असू शकतो परिणाम ?
लोक ६ महिन्यांपर्यंत विषाणूपासून वाचवू शकतात. काही लसींचा परिणाम ६ महिन्यांपासून एका वर्षापर्यंत राहील असा विश्वास आहे. कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी लसीकरण १०० टक्के प्रभावी असल्याचे सीडीसीने वर्णन केले आहे. तसेच कोरोना विषाणूच्या यूके आणि दक्षिण आफ्रिकन प्रकारांविरूद्धही अनेक लसी प्रभावी आहेत. असे तज्ज्ञाकडून सांगितले आहे. दरम्यान, युवक आणि वृद्धांनाही प्राणघातक कोरोनापासून संरक्षित करण्यासाठी आता लसीकरण आवश्यक आहे. आणि, वृद्ध व्यक्तीस प्रथम लसीकरण करणे हा निकष योग्य आहे. यामुळे, त्यांची प्रतिकारशक्ती युवकांपेक्षा खूपच अल्प आहे. यामुळे, लस आपण आपल्या समाजातील आवश्यक असलेल्या दुर्बल लोकांपर्यंत पोहोचवायला हवी. अशा सूचना शासनाकडूनही देण्यात आल्या आहेत.

लस घेतल्यानंतर मास्क आवश्यक आहे का ?
अनेक लोक लसीकरण केल्यानंतर आपला निष्काळजीपणा करत आहेत. मास्क न घालणे आणि सामाजिक अंतर न पाळण्यानं कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. हा साथीचा रोग बराच काळ चालू राहील, लस घेतलं तरीही मास्क घालणं गरजेच आहे. आपण कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करणे चांगले ठरेल. लसीकरण केल्यानंतरही मास्क लावा कारण एकच डोस तुम्हाला विषाणूंपासून पूर्णपणे वाचवू शकत नाही. आपण जागरूक असले पाहिजे आणि इतरांना मास्क लावण्यास, सामाजिक अंतर पाळण्यास सांगायला हवं. असे तज्ज्ञाकडून सांगण्यात आले आहे.