Coronavirus : राज्यात 2106 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 95.24%

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये आणि नवीन रुग्णांचे प्रमाण यात आजही मोठी घट झाली आहे. आज (मंगळवार) 47 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात 2 हजार 405 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 2 हजार 106 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आजपर्यंत राज्यात 20 लाख 13 हजार 353 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात 19 लाख 17 हजार 450 कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.24 टक्के इतके झाले आहे. तर राज्यात सध्या 43 हजार 811 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

राज्यात आज एकूण 47 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजर्पंयत 50 हजार 862 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी राज्यात 30 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.53 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 43 लाख 15 हजार 227 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 20 लाख 13 हजार 353 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.06 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 84 हजार 944 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2 हजार 613 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.