Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसपुढं ‘सुपर पॉवर’ अमेरिका ‘हतबल’, बाधितांचा आकडा एक लाखाहून अधिक

न्यूयॉर्क : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनासमोर जागतिक महासत्ता असणारा अमेरिका हतबल झाल्याचे दिसतं आहे.अमेरिकेतील कोरोना संसर्गितांचा आकडा एक लाखांच्यावर पोहचला आहे.तर १५४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.अमेरिकेतील जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात १८ हजार अमेरिकेतील लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे.तर ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे.अमेरिकेतील १ लाख ४२५६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

गेल्या चार दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये ५० हजार नवीन रुग्ण आढळले आहे. तर जगभरात ५ लाख ९८ हजार २३६ जणांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे.त्यापैकी २७ हजार ३७२ जणांचा मृत्यू तर १ लाख ३३ हजार ३९१ जण उपचारानंतर बरे झाले आहे.

अमेरिकेतील कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजच्या माध्यमातून अमेरिकेच्या अर्थव्यस्थेला झालेल्या नुकसानीची भरपाई केली जाईल सांगितले.असे ट्रम्प यांनी सांगितले.

जगभरात कोरोना लागण झालेल्या यादीत इटली दुसऱ्या क्रमांकावर असून, इटलीमध्ये आतापर्यंत ८६ हजार ४९८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.गेल्या २४ तासांमध्ये इटलीत ९१९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये एकूण मृत्यूंची संख्या ९ हजार १३४ झाली आहे.