खुशखबर ! सलग तिसर्‍या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात ‘घसरण’, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोन्या-चांदीच्या दरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. लॉकडाऊन नंतर सुरु झालेल्या अनलॉक 1 मध्ये सोन्या-चांदीच्या दरात 12 दिवशी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात घसर झाली होती. शुक्रवारी बाजार उघडताच 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 47 हजार 513 रुपये होती तर संध्याकाळी बाजार बंद होताना सोन्याचे दर 47 हजार 334 इतके होते. तर चांदी 949 रुपयांनी स्वस्त झाली आहे. एक किलो चांदीचा दर शुक्रवारी 47 हजार 690 रुपये होता.

दिल्लीतील सोन्या-चांदीचे आजचे दर
राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 46 हजार 050 आहे तर चेन्नईमध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45 हजार 370 रुपये आहे. शुक्रवारी सराफ बाजार बंद होताना मुंबईत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45 हजार 400 रुपये होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीला मात्र झळाळी आल्याचे पहायला मिळाले. शुक्रवारी सोन्याची किंमत 1734 डॉलर प्रति औंस होती तर चांदी 17.62 डॉलर प्रति औंसवर स्थिरावली आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगासमोर आर्थिक मंदीचे सावट आहे. जगभरातील अनेक केंद्रीय बँका व्याजदरामध्ये कपात करून अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक अत्यंत जोखमीची ठरू शकते. परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे अधिक प्रमाणात वळले आहेत. बरेच जण सोन्यात गुंतवणूक करत असल्याने या किंमती येत्या काळात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.