Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 कोरोनाचे 1025 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 99 हजार 798 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 29 हजार 537 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 855 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 884 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.38 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 38 हजार 596 रुग्णांपैकी 3 लाख 19 हजार 693 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 667 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.42 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 351 रुग्णांपैकी 47 हजार 495 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 157 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 699 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 3 रुग्णांपैकी 41 हजार 325 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 96 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 582 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 621 रुग्णांपैकी 44 हजार 489 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 441 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 691 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 966 रुग्णांपैकी 46 हजार 796 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 494 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 676 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 596 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1025 , सातारा जिल्ह्यात 248, सोलापूर जिल्ह्यात 250, सांगली जिल्ह्यात 57 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 42 पुणे जिल्हयामध्ये 652, सातारा जिल्हयामध्ये 109, सोलापूर जिल्हयामध्ये 218, सांगली जिल्हयामध्ये 19 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 44 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 27 लाख 80 हजार 579 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 29 हजार 537 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 25 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )