Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 5 जणांचा मृत्यू तर 106 नवे पॉझिटिव्ह रूग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रशासनानं कोरोना रूग्णांच्या चाचण्या वाढविल्यामुळं कोराना व्हायरसचे रूग्ण शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. आज दिवसभरात 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे तर 106 नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 3093 वर जाऊन पोहचली आहे. आज दिवसभरात 144 रूग्णांना डिस्चार्ज दिला आहे. म्हणजेच ते कोरोनाबाधित उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत 1630 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


कोरोनामुळं आतापर्यंत 174 जणांचे बळी गेले आहेत. सध्या 132 क्रिटिकल रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 33 रूग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यातील अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 1289 आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा आणि पोलिस प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. सर्वच वरिष्ठ अधिकारी शासनाच्या नियमांची अंमलबजावणी होते का नाही हे पहात आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक जणांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सोशल डिस्टेन्सिंग पाळली पाहिजे असं प्रशासनाकडून वेळावेळी सांगण्यात येत आहे.