Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1072 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील 4 लाख 30 हजार 556 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 83 हजार 253 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 39 हजार 544 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 143 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.72 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 89. 10 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 12 हजार 699 रुग्णांपैकी 2 लाख 82 हजार 675 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 22 हजार 759 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.32 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.40 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 969 रुग्णांपैकी 35 हजार 699 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 855 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 37 हजार 902 रुग्णांपैकी 31 हजार 889 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 698 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 472 रुग्णांपैकी 37 हजार 438 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 474 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 560 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 211 रुग्णांपैकी 42 हजार 865 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 758 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 588 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 817 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 72, सातारा जिल्ह्यात 271, सोलापूर जिल्ह्यात 159, सांगली जिल्ह्यात 231 तर कोल्हापूर जिल्ह्यात 84 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 4 हजार 369 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 98, सातारा जिल्हयामध्ये 925, सोलापूर जिल्हयामध्ये 283, सांगली जिल्हयामध्ये 335 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 728 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 21 लाख 94 हजार 103 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 83 हजार 253 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 16 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )