Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1080 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 3 हजार 386 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 33 हजार 782 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 432 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 964 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.31 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 41 हजार 540 रुग्णांपैकी 3 लाख 21 हजार 855 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 397 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 288 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.24 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 924 रुग्णांपैकी 48 हजार 292 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 922 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 710 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 572 रुग्णांपैकी 41 हजार 766 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 212 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 594 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 725 रुग्णांपैकी 44 हजार 562 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 467 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 696 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 21 रुग्णांपैकी 46 हजार 911 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 434 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 676 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 460 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 80 , सातारा जिल्ह्यात 169, सोलापूर जिल्ह्यात 171, सांगली जिल्ह्यात 21 तर कोल्हापूर जिल्ह्यात 19 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 164 आहे. पुणे जिल्हयामध्ये 763, सातारा जिल्हयामध्ये 120, सोलापूर जिल्हयामध्ये 211, सांगली जिल्हयामध्ये 35 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 35 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 28 लाख 38 हजार 538 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 33 हजार 782 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 28 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )