Coronavirus : मुंबई-पुणेकरांचं टेन्शन वाढलं ! राज्यात आज 120 नवीन रुग्ण तर 7 जणांचा मृत्यू ; जुन्या पुण्यात 37 ‘पोझिटीव्ह’, महाराष्ट्र 868 वर

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन  –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. आज राज्यात 120 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 868 झाली आहे. तर राज्यात आज 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज जुन्या पुण्यात 37 नवीन रुग्णांची नोंद झाली असून पुण्यातील काही भाग आज प्रशासनाने सील करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 4 जण मुंबईतील, नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील प्रत्येकी 1 व्यक्तीचा समावेश आहे.

बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मुंबई येथील एका 41 वर्षीय पुरुषाचा रविवारी मृत्यू झाला. त्याने परदेशात प्रवेश केला नव्हता. त्याला अतिरिक्त मद्यपानामुळे यकृताचा आजार होता. याच रुग्णालयात 62 वर्षीय पुरुषाचा 4 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्याने परदेशात प्रवास केला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब, डाव्या अंगाचा पॅरालिसिस हे आजारही होते. तर एका खसगी रुग्णालयात 80 वर्षीय पुरुषाचाही मृत्यू काल झाला होता. मुंबईच्या नायर रुग्णालयात नालासोपारा येथील एका 9 महिन्याच्या 30 वर्षीय गरोदर मताचा 4 एप्रिल रोजी संध्याकाळी मृत्यू झाला.

राज्यातील मृतांचा आकडा 52 वर

राज्यात कालपर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा 52 वर पोहचला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण 73 टक्के आहे. 45 वर्षाखालील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, सर्वसाधारणपणे 60 टक्के मृत्यू 61 वर्षावरील व्यक्ती आहेत. कालपर्य़ंत झालेल्या एकूण 45 मृत्यूपैकी साधारणत: 78 टक्के व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजारही होते. 60 वर्षावरील आणि मधुमेह, उच्च रक्तदाब असे असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.