Coronavirus : महाराष्ट्रात 131 अधिकाऱ्यांसह 1273 पोलिसांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत त्यामुळे सर्वच यंत्रणा कसोशीने लढा देत आहेत.देशातील सर्वाधिक रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. ही संख्या वाढतेच आहे. लॉकडाउनचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलीस 24 तास कर्तव्य बजावत आहेत.

https://twitter.com/ANI/status/1262272509157629953/photo/1

कर्तव्य बजावणाऱ्या या पोलिसांनाही कोरोनाने चांगलाच विळखा घातला आहे. महाराष्ट्रातील एकूण 1273 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्वांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 131 कर्मचारी असून, उर्वरित कर्मचारी आहेत. एकूण बाधितांपैकी 291 पोलिस बरे होऊन आपापल्या घरी परतले आहेत. 11 जणांना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे.

सर्व बाधित पोलिसांवर सरकारी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारकडून निमलष्करी दलाच्यातुकड्या मागवल्या होत्या. त्या आता महाराष्ट्रात विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्यामुळे पोलिसांना थोडीशी विश्रांती घेण्यासाठी उसंत मिळत आहे.