Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1341 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्याची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील 4 लाख 17 हजार 718 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 77 हजार 358 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 46 हजार 727 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 913 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.71 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.51 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 9 हजार 193 रुग्णांपैकी 2 लाख 74 हजार 967 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 27 हजार 87 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 139 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.31 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 88.93 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 76 रुग्णांपैकी 34 हजार 113 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 582 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 381 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 37 हजार 362 रुग्णांपैकी 30 हजार 974 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 102 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 286 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 757 रुग्णांपैकी 36 हजार 384 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 835 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 538 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 970 रुग्णांपैकी 41 हजार 280 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 121 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 569 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 192 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 341, सातारा जिल्ह्यात 242, सोलापूर जिल्ह्यात 264, सांगली जिल्ह्यात 288 तर कोल्हापूर जिल्ह्यात 57 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 4 हजार 630 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 3 हजार 315, सातारा जिल्हयामध्ये 242, सोलापूर जिल्हयामध्ये 455, सांगली जिल्हयामध्ये 492 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 126 अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 21 लाख 50 हजार 814 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 77 हजार 358 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 13 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )