Coronavirus : ‘कोरोना’मुळे 14 महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाची लागण झाल्यामुळे अवयव निकामी पडल्याने गुजरातमधील जामनगरमध्ये 14 महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. 5 एप्रिल रोजी मुलाला कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान, मंगळवारी अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकार्‍याने दिली आहे. मुलाचे आई-वडील रोजंदारी कामगार आहेत. यामुळे ते नेहमी स्थलांतर करत असतात. पण मुलाने कुठेही प्रवास केलेला नव्हता, तरीही त्याला करोनाची लागण झाली होती.

रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुलाला रुग्णालयात दाखल केल्यापासून त्याची प्रकृती खालावली होती. दोन दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे चिमुरड्याला व्हेंटिलेवरवर ठेवण्यात आले. अनेक अवयव निकामी झाल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये करोनामुळे मृत्यू झालेला हा सर्वात कमी वयाचा रुग्ण आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 16 झाली आहे. जामनगर जिल्ह्यात करोनाची लागण झालेला हा चिमुरडा पहिलाच रुग्ण होता.

मुरड्याला करोनाची लागण नेमकी झाली कशी याचा प्रशासन शोध घेत आहेत. मुलाचे आई वडील उत्तर प्रदेशचे असून एका कारखान्यात कामगार आहेत. पण त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये कुठेही प्रवास केला नव्हता. त्यांच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणे जाणवत नाही आहेत. पण सध्या त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच ते वास्तव्यास असणारा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. गुजरातमध्ये करोनाचे 175 रुग्ण असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like