Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवे पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 185 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून तर शहरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 5 जणांचा आज पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 4 हजार 464 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 356 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 69 हजार 979 वर जाऊन पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 60 हजार 145 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 5 हजार 370 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 416 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यापैकी 253 जणांचा व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.

You might also like