Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2020 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे विभागातील 56 हजार 414 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 95 हजार 76 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 36 हजार 77 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 955 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.34 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.72 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 76 हजार 669 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 47 हजार 197 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 663 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 19 हजार488 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 327, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 93, पुणे कॅन्टोंन्मेंट 144 , खडकी विभागातील 24 , ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 587 , यांच्याकडील रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 809 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 254 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 322 , जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 53, पुणे कॅन्टोंन्मेंट 31 , खडकी विभागातील 37, व ग्रामीण क्षेत्रातील 112 , रुग्णांचा समावेश आहे. तसेच 698 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.56 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 11 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 20, सातारा जिल्ह्यात 182 , सोलापूर जिल्ह्यात 263 , सांगली जिल्ह्यात 112 तर कोल्हापूर जिल्ह्यात 434 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 524 रुग्ण असून 1 हजार 865 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 540 आहे. कोरोनाबाधित एकूण 119 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 7 हजार 942 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 648 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 824 आहे. कोरोना बाधित एकूण 470 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 765 रुग्ण असून 612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 96 आहे. कोरोना बाधित एकूण 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 5 हजार 176 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 92 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 954 आहे. कोरोना बाधित एकूण 130 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 69 हजार 420 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 64 हजार 547 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 873 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 68 हजार 625 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.

( टिप :- दि. 29 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )