Pune : गॅसची वाहतूक करणार्‍याला चालकाला लुटलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   गॅसची वाहतूक करणाऱ्या चालकाला अडवून धक्काबुक्की करत दोघा दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाईलसह २५ हजारांची रोकड चोरुन नेली. मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजता वानवडीत ही घटना घडली.

याप्रकरणी श्रवण बिष्णोई (वय २९, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी सव्वा चार वाजता श्रवण टेम्पोतून गॅस घेउन चालले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांचा टेम्पो अडविला. तुला नीट टेम्पा चालविता येत नाही का, असे म्हणत धक्काबुक्की केली. त्यानंतर एका चोरट्याने श्रवणच्या खिशातील रोकड आणि मोबाईल मिळून २५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. अधिक तपास सहायक निरीक्षक जगताप करीत आहेत.