Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 206 नवे पॉझिटिव्ह तर 12 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 206 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून कोरोनामुळं शहरातील 12 जणांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील तिघांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 4 हजार 435 वर पोहचली आहे. दिवसभरात 181 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 67 हजार 188 वर गेली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 57 हजार 836 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 4 हजार 917 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 422 जण क्रिटिकल असून त्यापैकी 255 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.