Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2098 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे विभागातील 79 हजार 312 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 20 हजार 597 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 122 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 65.77 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. यापैकी पुणे जिल्हयातील 94 हजार 978 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 66 हजार 640 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 153 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2 हजार 185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.16 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 382 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 98, सातारा जिल्ह्यात 160, सोलापूर जिल्ह्यात 251 , सांगली जिल्ह्यात 188 तर कोल्हापूर जिल्ह्यात 685 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 4 हजार 549 रुग्ण असून 2 हजार 287 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 121 आहे. कोरोनाबाधित एकूण 141 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 9 हजार 490 कोरोना बाधीत रुग्ण असून 5 हजार 949 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 23 आहे. कोरोना बाधित एकूण 518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 440 रुग्ण असून 987 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 351 आहे. कोरोना बाधित एकूण 102 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 8 हजार 140 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 449 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 474 आहे. कोरोना बाधित एकूण 217 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 27 हजार 410 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 20 हजार 597 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. ( टिप :- दि. 4 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like