Coronavirus Maharashtra Updates : राज्यात एकुण 215 रुग्ण, रात्रीत आढळले 12 नवीन ‘कोरोना’बाधित ; पुण्यात 5, मुंबईत 3 तर नागपूरमध्ये 2 ने वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात रात्रीत नवीन १२ कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील संख्या आता २१५ पर्यंत पोहचली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत रुग्णांची संख्या २०३ होती. पुण्यात एकाच दिवशी ५ नवीन रुग्ण वाढले असून त्यात मार्केटयार्डमधील झोपडपट्टीतील दोघे कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाल्याने ही चिंता अधिकच वाढली आहे.

मुंबईत कोरोना बाधितांची संख्या आता ८९ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईमध्येही कोरोना समाजात पसरत चालला असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी रस्त्यावर येणारी गर्दीत कमी होताना दिसत नाही. लोक अजूनही कोरोनाला गंभीरपणे घेताना दिसत नाही.

नागपूरात आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नागपूरमध्ये ही संख्या आता १६ वर पोहचली आहे. पुण्यात एकाच दिवशी ५ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोराना बाधितांची संख्या ४० पर्यंत गेली आहे. त्यामुळे आता शहरातील चिंता आणखी वाढली आहे.