Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2331 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन-  पुणे विभागातील 81 हजार 764 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजार 967 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 961 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.98 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 97 हजार 309 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 68 हजार 775 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 303 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2 हजार 231 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 370 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 331, सातारा जिल्ह्यात 198, सोलापूर जिल्ह्यात 332 , सांगली जिल्ह्यात 229 तर कोल्हापूर जिल्ह्यात 280 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 4 हजार 747 रुग्ण असून 2 हजार 349 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 252 आहे. कोरोनाबाधित एकूण 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 9 हजार 822 कोरोना बाधीत रुग्ण असून 6 हजार 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 281 आहे. कोरोना बाधित एकूण 528 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 669 रुग्ण असून 1 हजार 16 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 545 आहे. कोरोना बाधित एकूण 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 8 हजार 420 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 611 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 580 आहे. कोरोना बाधित एकूण 229 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 41 हजार 88 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 23 हजार 967 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
( टिप :- दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like