Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2388 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे विभागातील 1 लाख 7 हजार 153 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 54 हजार 677 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 525 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 3 हजार 999 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 69.28 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 17 हजार 516 रुग्णांपैकी 88 हजार 590 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 237 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 689 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.39 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 6 हजार 504 रुग्णांपैकी 3 हजार 101 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 197 आहे. कोरोनाबाधित एकूण 206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 322 रुग्णांपैकी 8 हजार 83 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 659 आहे. कोरोनाबाधित एकूण 580 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 379 रुग्णांपैकी 2 हजार 213 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 995 आहे. कोरोनाबाधित एकूण 171 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 956 रुग्णांपैकी 5 हजार 166 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 437 आहे. कोरोनाबाधित एकूण 353 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 932 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 388, सातारा जिल्ह्यात 279, सोलापूर जिल्ह्यात 271, सांगली जिल्ह्यात 296 तर कोल्हापूर जिल्ह्यात 698 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 59 हजार 995 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 54 हजार 677 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. (टिप :- दि. 13 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)