दिलासादायक ! जगभरात ‘कोरोना’चा हाहाकार चालू असतानाच 24 ‘इंडियन्स’कडून COVID-19 वर ‘मात’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – नागरिकांनो कोरोनाला अजिबात घाबरु नका, कारण प्रतिकारक्षमता आणि द़ृढ संकल्पाच्या जोरावर व्हायरसविरुद्ध लढा देता येउ शकतो. असाच अनुभव भारतातील 24 जणांना आला आहे. त्यांनी कोरानावर उपचार घेउन बरे झाल्याचे सांगितले आहे.

भारतात कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत असून आतापर्यंत 325 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 74 वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता दिलासादायक म्हणजे देशातील 24 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. या 24 जणांनी व्यवस्थित उपचार घेऊन पुन्हा बरे होऊ शकले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून अनेक शहारांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या काही तासांत कोरोनाचे 10 नवे रुग्ण समोर आले आहेत. यातील 6 रुग्ण मुंबईतील असून इतर 4 रुग्ण पुण्यातील आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाव्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे. शुक्रवारी कोरोनाव्हायरसच 50 रुग्ण आढळले होते. तर शनिवारी तब्बल 98 रुग्ण आढळले. फक्त 24 तासांतच रुग्णाची संख्या दुप्पट झाली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 22 रुग्ण बरे झाले आहेत.