Coronavirus : नगर जिल्हयातील अर्ध्याहून जास्त रूग्णांनी ‘कोरोना’वर केली मात

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा असला तरी अनेक ठिकाणी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे दिलासादायक आहे. अहमदनगर जिल्हा हे देखील त्याचेच एक उदाहरण आहे. नगर मधील कोरोनाबाधितांच्या बरे होण्याचा आकडा हा जास्त आहे. कनगर मधील ऐकून कोरोनाबाधित रुग्णांनपैकी निम्याहून जास्त रुग्ण हे बरे होऊन घरी देखील गेले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात आतपर्यंत ३८ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. ३८ रुग्णांनपैकी २४ रुग्ण हे बरे झाले आहेत. शुक्रवारी बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या चार ‘करोना’बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. चारही रुग्णांचे १४ दिवसानंतरच्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. १२ रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत . या रुग्णांमध्ये एका परदेशी नागरिकचा देखील समावेश आहे