Coronavirus : चिंताजनक ! देशात दर तासाला 1000 रूग्ण, बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनाने जगभरात हाहाकार पसरवला असून भारतात तर दिवसेंदिवस थैमान सुरू आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या आकड्यांचे नवीन रेकॉर्ड होत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दर तासाला सरासरी एक हजार नवीन रुग्णांची नोंद केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 24 तासांमध्ये 24 हजार 850 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनामुळे 613 लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनामुळे 24 तासांत मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातही दिलासा देणारी बाब म्हणजे भारतात रिकव्हरी रेट चांगल पाहायला मिळत आहे. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 6 लाख 73 हजार 165 वर पोहोचली आहे. त्यापैकी 4 लाख 09 हजार 083 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भारतात कोरोना संसर्गातून बरे होण्याचा रिकव्हरी रेट 60 टक्क्यांवर पोहोचल्याने दिलासा मिळत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 9 कोटी 78 लाख 9 हजार 66 लोकांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्लीमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.