Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2449 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे विभागातील 1 लाख 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 58 हजार 781 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 223 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 4 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 19 हजार 965 रुग्णांपैकी 91 हजार 389 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 821 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.18 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 6 हजार 836 रुग्णांपैकी 3 हजार 397 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 225 आहे. कोरोनाबाधित एकूण 214 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 749 रुग्णांपैकी 8 हजार 494 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 671 आहे. कोरोनाबाधित एकूण 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 650 रुग्णांपैकी 2 हजार 499 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 960 आहे. कोरोनाबाधित एकूण 191 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 581 रुग्णांपैकी 5 हजार 670 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 546 आहे. कोरोनाबाधित एकूण 365 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 104 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 449, सातारा जिल्ह्यात 332, सोलापूर जिल्ह्यात 427, सांगली जिल्ह्यात 271 तर कोल्हापूर जिल्ह्यात 625 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 77 हजार 626 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 58 हजार 781 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. (टिप :- दि. 14 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)