Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2487 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे : पुणे विभागातील 75 हजार 812 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 17 हजार 215 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 328 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 64.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 92 हजार 880 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 63 हजार 930 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 821 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2 हजार 129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 68.83 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 499 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 487 , सातारा जिल्ह्यात 161, सोलापूर जिल्ह्यात 193 , सांगली जिल्ह्यात 347 तर कोल्हापूर जिल्ह्यात 311 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 4 हजार 389 रुग्ण असून 2 हजार 218 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 35 आहे. कोरोनाबाधित एकूण 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 9 हजार 239 कोरोना बाधीत रुग्ण असून 5 हजार 439 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 282 आहे. कोरोना बाधित एकूण 518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 252 रुग्ण असून 955 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 203 आहे. कोरोना बाधित एकूण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 7 हजार 455 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 270 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 987 आहे. कोरोना बाधित एकूण 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख 99 हजार 788 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 17 हजार 215 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. ( टिप :- दि. 3 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )