Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2543 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे : पुणे विभागातील 1 लाख 24 हजार 755 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 74 हजार 256 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 44 हजार 750 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 4 हजार 751 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.6 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 29 हजार 569 रुग्णांपैकी 99 हजार 124 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 245 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 200 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.47 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.50 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 7 हजार 929 रुग्णांपैकी 4 हजार 449 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 220 आहे. कोरोनाबाधित एकूण 260 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 14 हजार 186 रुग्णांपैकी 9 हजार 600 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 964 आहे. कोरोनाबाधित एकूण 622 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 7 हजार 15 रुग्णांपैकी 3 हजार 502 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 283 आहे. कोरोनाबाधित एकूण 230 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 15 हजार 557 रुग्णांपैकी 8 हजार 80 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 38 आहे. कोरोनाबाधित एकूण 439 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 60 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 543, सातारा जिल्ह्यात 336, सोलापूर जिल्ह्यात 357, सांगली जिल्ह्यात 437 तर कोल्हापूर जिल्ह्यात 387 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 37 हजार 184 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 74 हजार 256 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 18 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )