Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2724 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे विभागातील 1 लाख 27 हजार 529 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 78 हजार 490 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 46 हजार 199 आहे. कोरोनाबाधीत एकुण 4 हजार 762 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.4 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील 1 लाख 32 हजार 293 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 1 लाख 712 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 431 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 150 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.13 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 8 हजार 275 रुग्ण असून 4 हजार 658 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 348 आहे. कोरोनाबाधित एकूण 269 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील 14 हजार 473 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 हजार 859 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 983 आहे. कोरोना बाधित एकूण 631 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 7 हजार 309 रुग्ण असून 3 हजार 721 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 339 आहे. कोरोना बाधित एकूण 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यातील 16 हजार 140 कोरोना बाधीत रुग्ण असून 8 हजार 579 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 98 आहे. कोरोना बाधित एकूण 463 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 234 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 724, सातारा जिल्ह्यात 346, सोलापूर जिल्ह्यात 287, सांगली जिल्ह्यात 294 तर कोल्हापूर जिल्ह्यात 583 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 53 हजार 96 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 78 हजार 490 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 19 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )