Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2790 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे विभागातील 4 लाख 8 हजार 495 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 73 हजार 341 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 52 हजार 91 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.30 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 6 हजार 864 रुग्णांपैकी 2 लाख 68 हजार 526 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 31 हजार 282 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.51 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 611 रुग्णांपैकी 33 हजार 533 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 714 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 364 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 36 हजार 847 रुग्णांपैकी 30 हजार 282 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 300 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 171 रुग्णांपैकी 35 हजार 383 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 268 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 848 रुग्णांपैकी 40 हजार 771 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 527 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 550 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 703 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 720, सातारा जिल्ह्यात 316, सोलापूर जिल्ह्यात 256, सांगली जिल्ह्यात 277 तर कोल्हापूर जिल्ह्यात 134 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 5 हजार 13 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 790 ,सातारा जिल्हयामध्ये 422, सोलापूर जिल्हयामध्ये 260, सांगली जिल्हयामध्ये 546 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 995 अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 21 लाख 20 हजार 294 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 73 हजार 341 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 11 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )