Coronavirus Impact : राज्यातील कारागृहातून 2856 बंदी सोडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारागृहातून तबल 2856 बंदीची सुटका करण्यात आली आहे. तात्पुरत्या जामिनावर त्यांना सोडण्यात आले आहे. दरम्यान कारागृह विभाग जवळपास 8 हजार बंदी सोडण्याच्या तयारीत आहे. टप्याटप्याने बंदी सोडले जात आहेत.

कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले असून, राज्यात संचारबंदी आहे.

यापार्श्वभूमीवर कारागृहात असणाऱ्या बंदीवानांना सोडण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या व्हायरसची कारागृहात लागण झाल्यास मोठे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली होती. तर कारागृहात संख्येपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने पॅरोल आणि तात्पुरत्या जामीनावर सोडावे असे आदेश न्यायालयाने दिले होते.

ज्यातील विविध कारागृहातून बंदी सोडण्यात येत आहेत. गेल्या 27 मार्च पासून 4 एप्रिलपरियंत 2856 बंदी सोडले आहेत. दरम्यान देशविरोधी कारवाया, पोस्को, अंडर ट्रायल आणि शिक्षा भोगणारे कैदी याना वगळण्यात आले आहे. मात्र. त्यानतर देखीलही कारागृहात मर्यादेपेक्षा अधिक कैदी आहेत. राज्यात कारागृहांची बंदी क्षमता ही 24 हजार आहे. परंतु जवळपास 35 हजाराहून अधिक बंदी कारागृहात आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार 5 वर्षाखालील शिक्षा असणारे तसेच किरकोळ गुन्ह्यातील कैदी सोडले जात आहेत. देशभरातील 11 हजार बंदी न्यायालयाच्या आदेशानुसार जामिनावर बाहेर येणार आहेत.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात बोलविले जाणार आहे.

दरम्यान राज्यातील कारागृहातील कैदी संख्याच्या स्थिती पाहता प्रशासन 8 हजार बंदी सोडण्याचे नियोजन करत आहे. तर अजून शिक्षा झालेले कैदी देखील सोडण्यासाठी कारगृह प्रशासन न्यायालयात प्रयत्न करत आहे.

येरवडा मध्यवर्ती कारागृह – 202

सातारा जिल्हा कारागृह – 31

कोल्हापूर जिल्हा कारागृह – 45

कोल्हापूर सेंटर कारागृह–56

सांगली जिल्हा कारागृह–32

सोलापूर जिल्हा कारागृह–52

अहमदनगर जिल्हा कारागृह–27

औरंगाबाद सेंटर कारागृह– 88

नाशिकरोड सेंटर कारागृह– 81

उस्मानाबाद जिल्ह्य कारागृह– 19

लातूर जिल्हा कारागृह– 34

नांदेड जिल्हा कारागृह– 00

परभणी जिल्हा कारागृह–67

बीड जिल्हा कारागृह– 18

जालना जिल्हा कारागृह– 23

जळगाव जिल्हा कारागृह–64

भुसावळ जिल्हा कारागृह–20

धुळे जिल्हा कारागृह– 35

नागपूर जिल्हा कारागृह–7

मुंबई सेंटर कारागृह– 410

ठाणे सेंटर कारागृह–284

तळोजा सेंटर कारागृह– 245

कल्याण जिल्हा कारागृह–114

भायखळा जिल्हा कारागृह–114

भायखळा महिला कारागृह–34

अलिबाग जिल्हा कारागृह–9

रत्नागिरी जिल्हा कारागृह–28

सावंतवाडी जिल्हा कारागृह–08

नागपूर सेंट्रल कारागृह– 129

अमरावती सेंट्रल कारागृह–140

बुलढाणा जिल्हा कारागृह–33

अकोला जिल्हा कारागृह–105

वाशीम जिल्हा कारागृह–17

यवतमाळ जिल्हा कारागृह–52

वर्धा जिल्हा कारागृह– 92

चंद्रपूर जिल्हा कारागृह–97

भांडार जिल्हा कारागृह– 46

एकूण—————— 2856