Coronavirus : पिंपरीत टाळ्यांच्या गजरात ‘त्या’ 3 ‘कोरोना’मुक्त व्यक्तींची घरी ‘पाठवणी’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – संपुर्ण जगाला आव्हान देणाऱ्या कोरोना या भयानक आजारातून आज पिंपरी-चिंचवडमधील तीनजण बरे झाले असून त्यांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आला आहे. रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, डॉक्टरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना घरी सोडले असल्याची माहिती डॉ. विनायक पाटील यांनी दिली आहे.

गेल्या १४ दिवसांपासून डॉ. पाटील हे त्यांच्यावर उपचार करत होते. पिंपरी-चिंचवड शहरात दुबईहून आलेल्या तिघांना करोना विषाणू ची बाधा असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांच्यावर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. पिंपरी-चिंचवड शहरात ऐकून १२ करोना बाधत आढळले होते. डॉ. विनायक पाटील आणि त्यांच्या स्टाफ च्या अथक प्रयत्नानंतर १४ दिवसांनी तीन करोना बाधित रुग्णाच्या टेस्ट या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांना आज अकराच्या सुमार डिस्चार्ज देण्यात आला असून रुग्णवाहिका मधून घरी सोडण्यात आले.

त्यापूर्वी सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर स्टाफने रुग्णाचे मनोबल आणि डॉक्टरांचा उत्साह वाढवण्यासाठी टाळ्या वाजवल्या. यावेळी महानगर पालिकेच्या पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हे सर्व व्यक्ती ३५ ते ३६ वयोगतील असून दोन आठवडे होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास डॉक्टर पाटील यांनी सांगितले आहे.