खुशखबर ! ‘कोरोना’ व्हायरस नष्ट करण्यासाठी 1 नव्हे तर 3 वॅक्सीन ‘रेडी’, जाणून घ्या कधी होणार उपलब्ध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या विरोधात लस तयार करण्यासाठी अनेक देशातील शास्त्र प्रयत्न करत आहे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश येताना दिसून येत आहे. सोमवारी संध्याकाळी कोरोनाची लस तयार होण्याच्या बातमीने संपूर्ण जगभरातील लोकांना आशेचा किरण दाखवला आहे. जीवघेण्या विषाणू पासून बचाव करता येऊ शकतो, असे सर्वांना वाटू लागले आहे. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची लस तयार करण्यात येत असून सध्या तीन लस अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी जगभरातील कोणत्या लसी अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत जाणून घ्या.

युनिवर्सिटी ऑफ मेलबर्न
ऑस्ट्रेलियातील युनिवर्सिटी ऑफ मेलबर्नची लस शर्यतीत पुढे आहे. या तज्ज्ञांनी 100 वर्षे जुन्या टीबीच्या औषधापासून कोरोना व्हायरसची लस तयार केली आहे. व्हायरसशी लढण्यासाठी ही लस फारशी कार्यक्षम नसून व्हायरसशी लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ही लस यशस्वी ठरली आहे. या लसीच्या परिक्षणाचे 2 टप्पे पूर्ण झाले असून आता अंतीम टप्प्यातील संशोधनास सुरुवात होणार आहे.

सिनावॅक
चीनी वैज्ञानिक कोरोना व्हायरसची लस तयार करण्याच्या शर्यतीत सगळ्यात पुढे आहेत. ज्या देशातून ही महामारी पसरली त्या देशात कोरोना व्हायरसच्या लसीचे नमुने तयार करण्यात आले आहेत. चीनी कंपनी सिनोवॅक बायोटेक ने दावा केला आहे की, जगभरातील अनेक देशांमध्ये या लसीची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. चीनी कंपनी कोरोनाची लस तयार करण्याच्या जवळपास पोहोचली असून आता ब्राझिल आणि बांग्लादेशमध्ये या लसीचे परिक्षण सुरु करण्यात आले आहे.

एक्स्ट्राजेनेका
या लसीबाबत काल अनेक सकारात्मक बातम्या आल्या. ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील एक्स्ट्राजेनका या लसीचे मानवी परिक्षण यशस्वी झाले आहे. म्हणजेच आता शेवटच्या टप्प्यातील लसीचे परिक्षण पूर्ण होण्यासाठी आता जास्त कालावधी लागणार नाही. या लसीचा शेवटच्या टप्प्यातील परिक्षण साऊथ आफ्रिका आणि ब्राझिलमध्ये घेण्याचा निर्णय ब्रिटीश तज्ज्ञांनी घेतला आहे.

लस तयार होण्यास किती काळ लागू शकतो
जर दुसऱ्या टप्प्यात लसीचे क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाले तर लस पूर्णपणे तयार झालेली असते. मात्र, कोरोना व्हायरस हा माहामरीच्या स्वरुपात पसरला आहे. संपूर्ण जगभरातील कोट्यावधी लोकांना संक्रमित केले आहे. शेवटच्या टप्प्यातील चाचणी झाल्यानंतर क्लिनिकल ट्रायलसाठी 1 ते 4 वर्षा पर्यंतचा कालावधी लागू शकतो. तरिही संशोधक सगळी परिक्षण वेगाने करत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लस सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध होऊ शकते. अशी आशा तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.