Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3291 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्याची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील 3 लाख 2 हजार 758 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 90 हजार 75 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 77 हजार 87 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10 हजार 230 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.62 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 57 हजार 797 रुग्णांपैकी 2 लाख 10 हजार 551 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 41 हजार 487 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 759 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 81.67 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 31 हजार 514 रुग्णांपैकी 21 हजार 625 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 949 आहे. कोरोनाबाधित एकूण 940 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 29 हजार 719 रुग्णांपैकी 20 हजार 760 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 894 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 30 हजार 719 रुग्णांपैकी 20 हजार 588 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 970 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 161 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 40 हजार 326 रुग्णांपैकी 29 हजार 234 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 787 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 305 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 440 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 291, सातारा जिल्ह्यात 690, सोलापूर जिल्ह्यात 410, सांगली जिल्ह्यात 697 तर कोल्हापूर जिल्ह्यात 352 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 17 लाख 19 हजार 808 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 90 हजार 75 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 22 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )