Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 330 नवे पॉझिटिव्ह तर 9 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 330 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून कोरोनामुळं दिवसभरात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 4 जणांचा पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत पुण्यात कोरोनाचे 4 हजार 426 बळी गेले आहेत. दिवसभरात 245 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 66 हजार 982 वर गेली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 57 हजार 655 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 4 हजार 901 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकूण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 390 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 232 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.