Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 347 नवे पॉझिटिव्ह तर 8 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 347 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून दिवसभरात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 4 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं 4 हजार 471 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 345 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 70 हजार 697 वर पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 60 हजार 832 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 5 हजार 394 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 408 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 246 जणांना व्हेंटिलेटरव्दारे उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावे असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.