Coronavirus : मुंबईत डायल 108 सेवेतील BVG चे 35 कर्मचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील मुंबईत कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनापासून नागरिकांना वाचवण्यासाठी आरोग्य विभागासोबतच पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. त्याशिवाय बीव्हीजी ग्रुपकडून मुंबईत 108 रुग्णवाहिकांमार्फत रुग्णांना हॉस्पिलटमध्ये दाखल करण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने बीव्हिजीमधील 108 डायल सेवेतील 35 कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

कोरोनाची लागण झालेल्या 35 कर्मचाऱ्यांना कॉरंटाईन करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे. मुंबईत सध्या 66 रुग्णवाहिकांमधून रुग्णांना सेवा दिली जात आहे. 108 डायल सेवेतील 35 कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी 108 सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. 108 डायल सेवा सुरु असून कर्मचारी आपले काम करत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच 10 मे पर्य़ंत 108 डायल सेवेमार्फत मुंबईत 11946 कोरोना संशयित रुग्णांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सेवेतील 35 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असली तरी या सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातच आरोग्य विभागावर ताण वाढत आहे. त्यातच आरोग्य सेवेत काम करणाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता अधिकच वाढली आहेत. त्यातच बिव्हिजीच्या 108 डायल सेवेतील 35 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या युद्धात कोरोना योद्ध्यांना देखील कोरोनाने विळखा घातला आहे.

BVG च्या डायल 108 सेवेतील 35 कर्मचार्‍यांना ‘कोरोना’ची लागण झाल्याची माहिती डॉ. ज्ञानेश्वर शेळके (चिफ ऑपरेशन ऑफिसर, महाराष्ट्र इमर्जन्सी सर्व्हिस) यांनी पोलीसनामा ऑनलाइनशी बोलताना दिली आहे.