Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3521 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील 3 लाख 15 हजार 81 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 3 हजार 416 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 77 हजार 778 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10 हजार 557 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 78.10 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 65 हजार 204 रुग्णांपैकी 2 लाख 17 हजार रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 42 हजार 283 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 921 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 81.82 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 33 हजार 72 रुग्णांपैकी 23 हजार 215 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 857 आहे. कोरोनाबाधित एकूण एक हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 30 हजार 787 रुग्णांपैकी 21 हजार 591 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 103 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 32 हजार 225 रुग्णांपैकी 22 हजार 366 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 652 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 207 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 128 रुग्णांपैकी 30 हजार 909 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 883 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 702 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 521, सातारा जिल्ह्यात 850 , सोलापूर जिल्ह्यात 557, सांगली जिल्ह्यात 685 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 89 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 17 लाख 72 हजार 876 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 3 हजार 416 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 24 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like