Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 355 नवे पॉझिटिव्ह तर 7 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 355 नवे पॉझिटिव्ह आढळले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील तिघांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 4 हजार 478 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 378 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 71 हजार 52 वर गेली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 1 लाख 61 हजार 210 जण उपचारानंतर बरे झाले असून रूग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 5 हजार 364 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 422 जण क्रिटिकल असून त्यापैकी 255 जणांचा व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं आहे.

You might also like