Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 369 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे विभागातील 4 लाख 58 हजार 855 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 97 हजार 142 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 473 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 814 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.30 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 20 हजार 112 रुग्णांपैकी 2 लाख 98 हजार 677 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 13 हजार 794 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 641 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.39 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.30 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 373 रुग्णांपैकी 39 हजार 692 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 178 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 503 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 409 रुग्णांपैकी 34 हजार 626 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 368 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 416 रुग्णांपैकी 40 हजार 768 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 26 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 622 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 832 रुग्णांपैकी 45 हजार 92 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 107 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 633 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 899 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 369, सातारा जिल्ह्यात 113, सोलापूर जिल्ह्यात 139, सांगली जिल्ह्यात 223 तर कोल्हापूर जिल्ह्यात 55 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 967 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 922 ,सातारा जिल्हयामध्ये 535, सोलापूर जिल्हयामध्ये 161, सांगली जिल्हयामध्ये 244 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 105 अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 23 लाख 14 हजार 716 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 97 हजार 142 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 26 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )