Coronavirus : देशात 24 तासात 37 जणांचा मृत्यू, ‘कोरोना’बाधितांची संख्या 6761 वर

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोना या महामारीला आळा घालण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन लागू केला आहे. असं असलं तरी बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहेत. याशिवाय अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. गेल्या 24 तासांत देशात 37 लोकांना मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती दिली आहे. सध्याच्या स्थितीमुळं आता लोकांनमध्ये भीतीचं वातावरण पसरताना दिसत आहे.

सध्या लागू केलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिल 2020 पर्यंत आहे. परंतु देशात जे काही घडत आहे ते पाहिल्यानंतर आता हा लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो असा अंदाज आहे. अलीकडेच अशी माहिती समोर आली आहे की, ओडिसा आणि पंजाब या दोन्ही राज्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढवून 30 एप्रिल 2020 केली आहे.

आरोग्य मंत्रालयानं कोरोनाबद्दल दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात देशात 37 जण दगावले आहेत. तर 896 नवीन रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे. देशातील बाधितांचा एकूण आकडा हा आता 6761 वर गेला आहे. या महामारीमुळं अद्याप 206 जणांना मृत्यू झाला आहे. ज्या रुग्णांनी यावर मात केली आणि ते बरे झाले आहेत त्यांचा आकडा 516 इतका आहे.