Coronavirus : आरोग्यमंत्र्यांनी दिली दिलासादायक माहिती, म्हणाले – ‘4 भारतीय लस चाचणीच्या टप्प्यात’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात कोरोनाविरोधातील लस तयार करण्यावरही वैज्ञानिक दिवसरात्रा काम करत आहेत. दरम्यान, देशात 14 ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचे काम सुरू असून त्यापैकी 4 लसींची लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्राी डॉ. हर्षवर्धन यांनी भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्याशी सोशल मीडियावरून संवाद साधला. पाच महिन्यांच्या आत 4 लसींचे क्लिनिकल ट्रायल केले जाऊ शकते असे हर्षवर्धन म्हणाले. चर्चेदरम्यान राव यांनी करोनाच्या लसीबद्दल त्यांना माहिती विचारली असता, 100 पेक्षा अधिक जण यावर काम करत आहेत. हे काम विविध टप्प्यांवर सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटना या प्रयत्नांचे संयोजन करत आहे. भारतदेखील यावरील लस शोधण्यात सक्रीयरित्या काम करत आहे. भारतात 14 ठिकाणी यावर काम सुरू असून ते सध्या निरनिराळ्या टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैव तंत्रज्ञान विभाग नियामक मंजुरी, अनुदान आणि आर्थिक अशा प्रकारे मदत करत आहे.

देशातील 14 पैकी ठिकाणी सुरू असलेल्या लसींची येत्या चार ते पाच महिन्यात क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. सध्या त्या सर्व प्री क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यावर आहेत, सध्या कोणत्याही लसीची अपेक्षा करणे ही घाई ठरू शकते. लस विकसित करणे ही मोठी प्रक्रिया आहे. लस पूर्णपणे विकसित होण्यासाठी एखाद वर्ष लागू शकते. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हात धुत राहणे, स्वच्छता राखणे हे त्यावरील उपाय आहेत. आजारावर लस किंवा यावरील योग्य उपचार सापडत नाहीत तोवर हिच काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like