Coronavirus : पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 400 नवे पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 400 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळं तब्बल 4 हजार 461 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 360 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 69 हजार 794 वर गेली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 59 हजार 789 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरातील कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 5 हजार 544 एवढी आहे. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 409 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 245 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावे असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.

You might also like