Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 426 नवे पॉझिटिव्ह तर 9 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 426 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून दिवसभरात शहरातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील तिघांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं 4 हजार 446 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 258 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 68 हजार 30 वर पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 58 हजार 312 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यातील कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 5 हजार 272 एवढी आहे. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 409 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 247 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.