Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4273 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील 2 लाख 11 हजार 800 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 84 हजार863 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 65 हजार 580 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 7 हजार 483 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.63 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.35 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 97 हजार 286 रुग्णांपैकी 1 लाख 57 हजार 29 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 35 हजार 717 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 540 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.59 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 988 रुग्णांपैकी 11 हजार 29 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 446 आहे. कोरोनाबाधित एकूण 513 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 21 हजार 264 रुग्णांपैकी 15 हजार 388 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 36 आहे. कोरोनाबाधित एकूण 840 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 708 रुग्णांपैकी 9 हजार 478 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 547 आहे. कोरोनाबाधित एकूण 683 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 29 हजार 617 रुग्णांपैकी 18 हजार 876 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 834 आहे. कोरोनाबाधित एकूण 907 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 952 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 273 , सातारा जिल्ह्यात 498 , सोलापूर जिल्ह्यात 560 , सांगली जिल्ह्यात 683 तर कोल्हापूर जिल्ह्यात 938 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 13 लाख 15 हजार 523 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 84 हजार 863 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 7 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )