Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 430 नवे पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 430 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळं पुण्यात आतापर्यंत तब्बल 4 हजार 449 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 382 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 68 हजार 460 वर पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 58 हजार 694 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 5 हजार 317 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 403 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 248 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.