Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 443 नवे पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 443 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून शहरातील चौघांचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील चार जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 4 हजार 421 जणांचा बळी गेला आहे. आज दिवसभरात 246 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 66 हजार 652 वर जावून पोहचली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 57 हजार 410 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे 4 हजार 821 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 395 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 247 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन वेळावेळी प्रशासनाकडून करण्यात येतं आहे.