Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4456 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे विभागातील 2 लाख 63 हजार 747 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 50हजार 846 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 78 हजार इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 9 हजार 99 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.17 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 35 हजार 852 रुग्णांपैकी 1 लाख 88 हजार 154 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 443 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 255 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.78 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 26 हजार 448 रुग्णांपैकी 17 हजार 107 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 589 आहे. कोरोनाबाधित एकूण 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 26 हजार 390 रुग्णांपैकी 18 हजार 245 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 166 आहे. कोरोनाबाधित एकूण 979 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 25 हजार 653 रुग्णांपैकी 15 हजार 437 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 247 आहे. कोरोनाबाधित एकूण 969 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 36 हजार 503 रुग्णांपैकी 24 हजार 804 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 555 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 144 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 7 हजार 752 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 456 सातारा जिल्ह्यात 972, सोलापूर जिल्ह्यात 461, सांगली जिल्ह्यात 865 तर कोल्हापूर जिल्ह्यात 798 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 15 लाख 43 हजार 548 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 50 हजार 856 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 16 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )