Coronavirus | ग्वाल्हेरमध्ये 5 दिवसाच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Coronavirus | भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरू लागला आहे. त्यामुळे लोकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे. रुग्णवाढीची संख्या तीन लाखाहून अधिक आहे. अनेक निर्बंध लागू केले आहेत. पण तरीही रुग्ण संख्या आटोक्यात येत नाही. महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. अवघ्या पाच दिवसांच्या बाळाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. (Coronavirus)

 

ग्वाल्हेरमधील ही घटना असून मुलीच्या जन्मानंतर आई आणि बाळाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये आईचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता तर बाळाचा पॉझिटिव्ह. मुलीचा जन्म झाला. त्यानंतर तीन दिवसांनी ती आजारी असल्याने ग्वाल्हेरच्या कमलाराजा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं होतं. येथे 2 दिवस मुलीवर उपचार सुरू होते. यानंतर मुलीचा मृत्यू झाला. महत्त्वाची बाब म्हणजे आई निगेटिव्ह आणि बाळ पॉझिटिव्ह आल्यान आरोग्य विभाग हैराण झाला. (Coronavirus)

 

Web Title :- Coronavirus | 5 day old girl dies of corona in gwalior

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा