Coronavirus : पुण्यात 24 तासात 5 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 77 जणांचा बळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं सर्वत्रच थैमान घातलं आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत जात आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबई आणि पुण्यात रूग्णांची संख्या झपाटयानं वाढत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात 5 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे. पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1230 वर जावून पोहचली आहे.

पुण्यात आज 5 जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या 77 वर जावून पोहचली आहे. सातार्‍यात 33 रूग्ण असून आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. सोलापूरमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून आकडा 61 पर्यंत पोहचला आहे. सोलापूरमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सांगलीत 29 कोरोनाबाधित असून आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापरमध्ये देखीदल 10 कोरोनाबाधित असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत पुणे विभागातील 213 रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या पुणे विभागात 1066 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. दरम्यान, विभागात आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 46 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.