Coronavirus : दिलासादायक ! देशात 24 तासात 51 हजार रुग्णांची ‘कोरोना’वर मात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये जवळपास 50 ते 55 हजार नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात तब्बल 54 हजार 736 नवीन लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाग्रस्ताचा आकडा 17 लाख 50 हजार 724 वर पोहचला आहे.

गेल्या 24 तासात 853 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोना बाधितांचा आकडा 37 हजार 364 वर पोहचला आहे. देशात 5 लाख 67 हजार 730 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. या रुग्णावर उपचार सरु आहेत. तर 11 लाख 45 हजार 630 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशात 51 हजार 255 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या भारताचा रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) चांगले आहे.

दरम्यान, देशात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. महाराष्ट्रात शनिवारी 9601 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहे.तर 10 हजार कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याच दरम्यान 322 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 15316 वर गेली आहे. तर राज्यात 431719 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 149214 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यामध्ये 46345 रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत.