Coronavirus : दिलासादायक ! एका दिवसात ‘कोरोना’चे 57381 रूग्ण झाले बरे, रिकव्हरी रेट 71.61%

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोना व्हायरसने संक्रमित झालेले 18 लाखांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, मागील 24 तासात 57,381 रूग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर रूग्ण बरे होण्याचा दर 71.61 टक्के झाला आहे. मंत्रालयानुसार भारतात मागील 24 तासात कोविड-19 च्या 8,68,679 टेस्ट करण्यात आल्या आहेत. एकुण 2.85 कोटीपेक्षा जास्त टेस्ट झाल्या आहेत. 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बरे होण्याचा राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. सोबतच, 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बरे होण्याचा दर 50 टक्केपेक्षा जास्त आहे.

दिल्लीत रूग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक 89.87 टक्के आहे. यानंतर तमिळनाडुत 81.62 टक्के, गुजरातमध्ये 77.53 टक्के, मध्यप्रदेशात 74.70 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 73.25 टक्के, राजस्थानमध्ये 72.84 टक्के, तेलंगनात 72.72 टक्के आणि ओडिशात 71.98 टक्के आहे.

बरे झाल्यानंतर आणि रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संक्रमणातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 18,08,936 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार सध्या संक्रमणाची 6,68,220 प्रकरणे आहेत, जी एकुण प्रकरणांच्या 26.45 टक्के आहे. मंत्रालयाने म्हटले, भारतातील मृत्युदर जागतिक सरासरीच्या खाली आहे. सध्या हा 1.94 टक्के आहे.

देशात मागील 24 तासात कोरोना रूग्णांच्या संख्येने 25 लाखांचा आकडा ओलांडला आहे. शुक्रवारी कोरोनाची 65 हजार 002 नवी प्रकरणे समोर आली, तर 996 लोकांना आपला जीव गमवावा लागला. नव्या केस आल्यानंतर देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 25 लाख 26 हजार 192 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून जारी आकड्यांनुसार, देशात आता कोरोनाच्या सध्या कोरोनाच्या 6 लाख 68 हजार 220 अ‍ॅक्टिव्ह केस आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 49 हजार 36 रूग्णांचा जीव गेला आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 18 लाख 8 हजार 936 लोक रिकव्हर झाले आहेत. देशात सर्वात जास्त प्रभावित महाराष्ट्र आहे.